Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडीत ‘बिघाडी’ ! ओवेसींकडून बिघाडीवर ‘शिक्कामोर्तब’


हैद्राबाद : वृत्तसंस्था- वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाल्याचे आता पक्के झाले आहे कारण एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आघाडीतील बिघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. इम्तियाज जलील यांनी केललं वक्तव्य म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका आहे असे स्पष्टीकरण ओवेसी यांनी दिलं आहे.
आगामी विधानसभा निवडणूक एमआयएम स्वबळावर लढवणार आहे अशी घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जागावाटपावरून वंचित आणि एमआयएमचं बिनसलं होतं. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे एमआयएमने 95 जागांची मागणी केली होती. परंतु एवढ्या जागा देणे शक्य नसल्याचे आंबेडकरांनी सांगितले होते. जागावाटपावरून आता दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडली होती.
यानंतर पक्षातील या फुटीसाठी इम्तियाज जलील जबाबदार आहेत असा आरोप वंचितकडून करण्यात आला होता. यानंतर दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोपास सुरुवात झाली होती. दरम्यान वंचित आणि MIM मधील फुटीसाठी इम्तियाज जलील जबाबदार आहेत असा आरोप वंचितने केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपात सन्मान राखला नाही असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं होतं.
यानंतर जलील यांच्यावर आघाडीच्या प्रवक्त्यांकडून आरोप करण्यात आला होता की, जलील एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे ऐकत नाहीत. वंचितचे प्रवक्ते सचिन माळी यांनी जलील यांच्यावर आरोप करत म्हटले की, “जलील हे खासदार झाल्याने त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली आहे. जलील हे पक्ष प्रमुख ओवेसी यांचे आदेश पाळत नाहीत असाही आरोप वंचितकडून करण्यात आला होता.
(News Creddit - Bahujan
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.