मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं झालं तर मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र माझा या गोष्टीवर विश्वास आहे की एखादी गोष्ट कॉपी करुन, नक्कल करुन प्रसिध्दी मिळते मात्र ती प्रसिध्दी ते यश फार काळ टीकत नाही अशी गरळ ओकत स्वत:ला गानसम्राज्ञी म्हणणार्या लता मंगेशकर यांच्या पोटात रानू मंडलच्या यशाने मुरडा उठला आहे. त्यामुळे एखाद्या ब्राम्हण समाजातून आलेल्या गायिकेचे बहुजन समाजाच्या गायिकेबद्दल किती खालच्या पातळीवर मत आहे हे दिसून येते.
आज देशात फिल्म इंडस्ट्रीजमध्ये ब्राम्हण जातीचेच वर्चस्व आहे. एकप्रकारे सांस्कृतिक वर्चस्व ब्राम्हणांनी निर्माण केले आहे. आज लता मंगेशकर यांच्यापेक्षा बहुजन समाजात अस्सल गायक, गायिका आहेत. परंतु त्यांना संधी मिळत नाही. संधी का मिळत नाही तर सांस्कृतिक क्षेत्रावर ब्राम्हणांची मोनोपॉली आहे. ते त्यांच्याच लोकांना संधी देतात. परंतु आमच्या लोकांना संधी देऊन बघा कसे त्या संधीचे सोने होईल.
लता मंगेशकरने तर बहुजन गायक प्रल्हाद शिंदे यांच्याबरोबर गीत गायन करण्यास नकार दिला होता. एवढी लता मंगेशकरांना मग्रुरी आहे. केवळ ब्राम्हण असल्यानेच त्यांना डोक्यावर घेतली आहे. मंगेशकर फॅमिलीला तसे बहुजन गायकांचे वावडेच आहे. त्यामुळे रानू मंडल संदर्भात लता मंगेशकर नामक स्वत:ला गानसम्राज्ञी म्हणणार्या महिलेने विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करणे स्वाभाविक आहे. कारण ‘सुंभ जळला तरी पीळ काही जळत नाही’ अशी एक मराठीत म्हण आहे. म्हणजे आपला स्वभाव गुणधर्म सोडायचा नाही असा त्यांचा खाक्या आहे. मंगेशकर फॅमिली कट्टर आरएसएस समर्थक आहे.
कुठे लता मंगेशकर आणि कुठे रानू मंडल...! या दोघींची तुलना केली तर निश्चितच रानू मंडल सरस आहे. फक्त रानू मंडल ही सवर्ण म्हणजे ब्राम्हण नाही एवढाच काय तिचा दोष. पश्चिम बंगालमध्ये रेल्वेप्लॅटफॉर्मवर गाणे गाऊन आपल्या पोटाची खळगी भागवणे हे तिच्या जीवन जगण्याचे सार असेल तर त्याला काय करणार आहात? याचा अर्थ रानू मंडल या जीवनाशी संघर्ष करत आहेत.
जीवनाशी संघर्ष करता त्यांनी गाण्याला आधार बनवला तर कुठे बिघडले? लता मंगेशकर तुम्ही तर सुखवस्तू कुटूंबातून आला आहात, त्यामुळे गरीबीचं दु:ख काय असतं ते रानू मंडल यांनाच माहित आहे. त्यामुळे आयत्या बिळावर रेघोट्या ओढणार्या लता मंगेशकरांपेक्षा रानू मंडल या आमच्यासाठी प्रेरणा आहेत. तुम्ही तर करोडोंची माया जमवली. त्यातील एक रूपया तरी लोकांसाठी खर्च केला आहात काय? परंतु रानू मंडल यांना हिमेश रेशमिया यांनी गाण्याची संधी देताच त्यांना सात लाख रूपयांचे मानधन दिले. त्यांनी ते विन्रमपणे नाकारले होते. हिमेश रेशमिया यांनी जबरदस्ती केल्याने ते मानधन यांनी घेतले. सलमान खान यांच्या वडीलांचा आदेश मानत हिमेश रेशमिया यांनी रानू मंडल यांना संधी दिली. याचा अर्थ त्यांच्याकडे उपजतच टॅलेंट आहे. त्या टॅलेंटला सलाम करण्याऐवजी नाक मुरडता. दुसर्याच्या यशाला नाक मुरडण्याचा अधिकार लता मंगेशकर तुम्हांला कुणी दिला?
भारतात अशा प्रकारच्या अनेक रानू मंडल आहेत, त्यांना संधीच मिळाली नाही. एकदा का संधी मिळाली की त्या कशा चमकतात हे रानू मंडल यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे गाण्याच्या ठेका हा ब्राम्हणांकडेच आहे. दुसर्यांनी गाऊच नये असा काही अर्विभाव आहे तो चुकीचा आहे. आज अनेक बहुजन समाजात गायक-गायिका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रावरची ब्राम्हणांची सद्दी समाप्त करायला वेळ लागणार नाही एवढे बहुजनांकडे टॅलेंट आहे.
रानू मंडल यांना सल्ला देणार्या लता मंगेशकर यांनी आपल्या पायाखाली काय जळतयं हे आधी त्यांनी पहावे. केवळ ब्राम्हण असल्यानेच तुम्हांला यशोशिखरावर पोहचवले आहे हे लक्षात घ्या. बाकी कर्तृत्व तुमचे शून्यच. रानू मंडल म्हणजे कोळशाच्या खाणीतला हिरा आहे. त्यामुळे हिरा हा चमकणारच. त्याला लता मंगेशकरांसारख्या महिलेने कॉमेंट करायची गरज नाही. जे अस्सल असतं ते बावनकशी. त्यामुळे घासून-पुसून तावून-सुलाखून अनेक रानू मंडल आज पुढे येत आहेत.
सांस्कृतिक क्षेत्रात बहुजनांचा वावर वाढत असल्याने कदाचित लता मंगेशकर यांच्या पोटात मुरडा उठला असावा. म्हणून त्याच नैराश्यातून त्यांनी रानू मंडल यांच्यावर कॉमेंट केली असावी. एखाद्याकडे नैसर्गिक टॅलेंट आहे त्याला संधी द्यावी असे तुम्हांला कधी वाटते का? कारण ब्राम्हणांपेक्षा कुणी मोठा होऊ नये हीच तुमची जातीय धारणा असते. लता मंगेशकर या गानकोकिळा वगैरे काही नसून कावळा आहेत. त्यांच्या गळ्यातून कावळ्याची कावकाव येते. एखादी गोष्ट कॉपी करुन, नक्कल करुन प्रसिध्दी मिळते मात्र ती प्रसिध्दी ते यश फार काळ टीकत नाही अशी गरळ ओकत लता मंगेशकर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे बहुजनांनी लता मंगेशकर यांचे गाणे ऐकू नये. आपणच त्यांना डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे त्यांचे फावले आहे. अशा ब्राम्हणांच्या गायकांवर बहुजनांनी बहिष्कार घालायला हवा. त्याशिवाय त्यांची जागा त्यांना कळणार नाही.
(Credit- MN Marathi संपादकिय लेख)