कालची रविंद्र राणे यांची बौध्दांवरची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट वाचली आणि दिव्याखाली पण अंधार असतो याची प्रचिती आली.
एक बौद्ध सेवानिवृत्त क्लास वन अधिकारी के घर का किस्सा मैं जब किसी तथाकथित अनुसूचित जाति वाले अंबेडक्राइट व्यक्ति के...
Posted by रविंद्र राणे on Monday, 2 September 2019
अखिल मानव जातीला उपदेश करणारी स्वयं प्रकाशित बौध्द मंडळी फेसबुक वरून उपदेशाचे डोस पाजत राहतात. आम्ही तेवढे शुध्द इतर सगळे परंपरावादी,सरंजामी, अक्कलशुन्य !
बरं असले बोलके पोपट फक्त सोशल मिडीया वरूनच आपले अगाध ज्ञान पाजाळत असतात. ग्राऊंड लेव्हलला जाऊन काम करण्याची यांची इच्छा नसते. शुध्द चोवीस कॅरेट आंबेडकरवादी असल्याचा यांना गंड झालेला असतो. मग आपल्या तोकड्या आकलनातून जोपर्यत तुम्ही बौध्द होत नाही तोपर्यत तुम्ही मुर्खच ! असली मांडणी करत राहतात. एकीकडे असला प्रकार तर दुसरीकडे प्रखर ब्राम्हण विरोध करतांना बोटचेपी भुमिका घेतांना दिसतात. ब्राम्हणांचा कर्दनकाळ ठरलेल्या मुलनिवासी सिध्दांताची खिल्ली उडविण्या पर्यत त्यांची मजल जाते. काही विनोदी पोस्टकर्त्यानी तर यावर विनोद तयार केले आहे. असो.
कालची रविंद्र राणे यांची बौध्दांवरची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट वाचली आणि दिव्याखाली पण अंधार असतो याची प्रचिती आली....
Posted by Prashant Maurya on Monday, 2 September 2019
कायम ओबीसीना शिव्या देण्यात धन्यता मानणारी ही स्वयंप्रकाशित बौध्द मंडळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये मांडलेली ब्राम्हणांनी ब्राम्हणवादाची जी तटबंदी निर्माण केली आहे त्याच्या आतील निष्पाप ब्राम्हणेतर सैन्याशीच लढत बसतात. ब्राम्हण की ब्राम्हणवाद या वादात त्यांची भुमिका खुपच मजेशीर असते. मी ब्राम्हणांच्या विरोधात नसून ब्राम्हणवादाच्या विरोधात आहे अशी मखलाशी करीत असतात. बाबासाहेबांच्या एका वाक्याला पत्थर की लकीर मानून पुढे ब्राम्हणां बद्दल बाबासाहेब काय म्हणतात हे सोयीस्करपणे टाळतात.
काही मंडळी तर कायम राजकीय मोड मध्ये राहून संरजामी लोकावरच लिहीत राहतात. जातीची उतरंड त्यांना कळली नाही असेच दिसते. प्रत्येक जण आपल्या वरच्या लोकांचा मत्सर करत असतो तर खालच्या लोकांचा द्वेष करीत असतो हा जातीव्यवस्थेचा परिणाम आहे.यांच्या लिखाणातून अशीच उतरंड दिसून येते. कॉज अॅन्ड एफेक्ट तयांना अद्याप कळलेला दिसून येत नाही. निव्वळ चांगले लिहीणे पर्याप्त नसून ते सर्वसमावेशक असले तर त्याचा स्विकार होतो. अन्यथा आपल्या एकजातीय कंपूत वाहवाही लुटून काही सामाजीक बदल होत नसतो.
एकजातीय कंपूतच रिपब्लिकन सारखी संकल्पना मांडून आनंदीत होणारे आताशी कुठे बहुजन संकल्पना मानायला लागले आहेत हे ही नसे थोडके.
(Prashant Thul Maurya FB)